मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेकडून एका व्हिडीओ पार्लरवर छापेमारी सुरू असताना एका व्यक्तीचा हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मुलुंड येथे घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
दिलीप शेजपाल (५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप शेजवाल हे कल्याण येथे राहणारे असून भांडुप येथे एका खाजगी कंपनीत कलेक्शनचे काम करीत होते. गुरुवारी सायंकाळी कलेक्शनचे काम आटोपून शेजपाल हे मुलुंड पश्चिम येथील संगम व्हिडीओ पार्लर या ठिकाणी गेले होते.
हे ही वाचा:
कमलनाथ यांचा म.प्र. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’
महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?
नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर
यादरम्यान समाज सेवा शाखेच्या पोलिसांनी व्हिडीओ पार्लरवर छापा टाकला असता ग्राहकांची पळापळ सुरू झाली, त्यात घाबरलेल्या दिलीप शेजपाल यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते कोसळले,त्याच्याकडे गोळी नसल्यामुळे त्यांनी घरी फोन करून गोळ्यांचे पाकीटाचे फोटो मागविले, तो पर्यत त्यांना पोलिसांनी अग्रवाल रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असे प्राथमिक निदान करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याने अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.