साकीनाका घटनेची पुन्हा आठवण; जावयाने केली सासूची निघृण हत्या

साकीनाका घटनेची पुन्हा आठवण; जावयाने केली सासूची निघृण हत्या

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पत्नी घरी दिसली नाही, म्हणून जावयाने पत्नी कुठे आहे म्हणून ६० वर्षाच्या सासूकडे चौकशी केली. मात्र सासूने सांगण्यास नकार देतात त्याने सासूची हत्या केली.

सासूच्या गुप्तांगात बांबू टाकून या जावयाने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील विलेपार्ले येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली असून जावई हा गुन्हेगारी प्रवृत्ती असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२ सप्टेंबरला विलेपार्ले येथे ६० वर्षीय वृद्धेच्या हत्येप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी जावयाला अटक करण्यात आली होती. या वृद्धेच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या तिच्या गुप्तांगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याने कळताच पोलिसानी या बाबत अटकेत असणाऱ्या जावयाकडे चौकशी केली असता त्याने सासूच्या गुप्तांगात लाकडी बांबू टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावरील गुन्ह्याच्या कलमात वाढ करून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी कलम दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

नाशिक हादरले! महिलेची दुचाकी अडवून बलात्कार

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती

अस्वस्थ करणारी राजकीय बधीरता…

अटक करण्यात आलेला जावई सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सुमारे २८ गुन्हे दाखल आहे. पतीच्या सततच्या गुन्हेगारीला कंटाळून पत्नीने दुसऱ्या सोबत लग्न करून दुसरीकडे राहण्यास गेली होती. दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून आल्यानंतर पत्नीला शोधायला तो सासरी गेला, पत्नी आढळली नाही, त्यामुळे त्याने सासुकडे पत्नीचा पत्ता मागितला. मात्र सासूने नकार देतात जावयाने तिची क्रूरपणे हत्या करून तिच्या गुप्तांगात लाकडी बाबूंने इजा केली. हत्येनंतर शवविच्छेदन अहवालात हा क्रूर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्धच्या कलमात वाढ केली असून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version