25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामासायबर ठगांसाठी बँक खाती पुरविणाऱ्या आमीर मणियारला अटक

सायबर ठगांसाठी बँक खाती पुरविणाऱ्या आमीर मणियारला अटक

३५ बँक खाती उघडल्याचे स्पष्ट

Google News Follow

Related

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तसेच सायबर ठगांना बँक खाती पुरविणाऱ्या आमीर फिरोज मणियार या मुख्य आरोपीस कुर्ला पोलिसांनी अटक केली. आमीरने एका खाजगी बँकेत एक- दोन नव्हे तर पस्तीस बँक खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यापैकी काही बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. फसवणुकीनंतर आलेल्या ईमेलवरुन बँकेने चौकशी सुरु केली आणि आमीरला तुरुंगाची हवा खावी लागली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

संजयकुमार राम दास हे अंबरनाथ येथे राहत असून एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. कुर्ला येथील बँकेची एक शाखा असून तिथेच ते कामावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना एक व्यक्ती बँकेत नियमित काही लोकांसोबत येत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी सहज म्हणून त्याची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान या व्यक्तीने त्याचे नाव आमीर मणियार असल्याचे सांगितले. तो अनेकांना बँक खाती उघडून देण्यास मदत करत असल्याचे सांगत होता. याच दरम्यान त्यांच्या बँक खातेदाराच्या खात्यातून ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. या चौकशीत संबंधित व्यक्ती विविध बँकेत आणून त्यांचे बँक खाती उघडून देण्यास मदत करत होता. त्याने उघडलेल्या बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीचे पैसे जमा होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित बँक खात्याची माहिती काढून या खात्यातील व्यवहाराची माहिती एकत्रित केली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता आमीर हा बँकेत आला होता. काही वेळानंतर तो बँकेच्या एटीएममध्ये गेला होता. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकाला सांगून त्याला बँकेत आणण्यास सांगितले. त्याची चौकशी केल्यानंतर आमीर हा कर्जतच्या नेरळ, तुलसी-दर्शन अपार्टमेंटचा रहिवाशी असून त्याने त्यांच्या बँक खात्यात अनेकांचे खाते उघडून देण्यास मदत केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी बहुतांश खातेदार त्याचे नातेवाईक होते. त्याने त्याचा आयात-निर्यातीचा व्यवसाय असून त्यासाठी त्याने बँकेत खाती उघडल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

का होते आहे नव्या समीकरणांची चर्चा?

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक!

शेअर बाजारात अदानी समूहाच्या समभागात सुधारणा

गेल्या दोन ते तीन महिन्यांत त्याने ३५ हून अधिक बँक खाते उघडले होते. त्यापैकी पाच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. याबाबत त्यांच्या शाखेत मेलवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात सायबर क्राईमच्या व्हिटफिल्ड पोलीस ठाण्याच्या एका मेलचा समावेश होता. ऑनलाईन फसवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्याच्या व्यवसायातील बिझनेस खाते असून त्यात काही पार्टीकडून पेमेंट प्राप्त झाल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच बँकेने कुर्ला पोलिसांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. आमीर मणियारला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सप्टेंबर २०२४ पासून बँकेत ३५ विविध खाती उघडल्याचे त्यात व्हिसा कार्ड घेतल्याचे सांगितले. या कार्डच्या व्यवहाराची चौकशी केल्यानंतर त्यातील सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद दिसून आले. तसेच बँक खात्यात जमा झालेली रक्कम एटीएममधून काढल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी आसिफला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले.

त्याच्या चौकशीत तो फसवणुक करणाऱ्या काही सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. याच सायबर ठगांसाठी त्याने संबंधित बँकेत ३५ खाती उघडल्याची कबुली दिली. बँकेला आलेल्या ईमेलनंतर बँकेच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर आमीरचे बिंग फुटले आणि तो सायबर ठगांसाठी बँकेत खाती उघडून देत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर बँक मॅनेजर संजयकुमार दास यांच्या तक्रारीवरुन आमीर मणियार याच्याविरुद्ध पोलिसांनी ३१७ (५), ३१८ (२), ३२३ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत, त्याने अशाच प्रकारे इतर काही बँकेत खाती उघडले आहेत का याचा पोलीस तपास करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा