25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामापराठ्याचे दुकान चालवणारा महिलांना पाठवत होता अश्लिल व्हीडिओ, केली अटक

पराठ्याचे दुकान चालवणारा महिलांना पाठवत होता अश्लिल व्हीडिओ, केली अटक

आरोपी विवाहित असल्याचे आले समोर

Google News Follow

Related

महिलांच्या ‘व्हाट्सअँप’वर अश्लील व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अजीज मोहम्मद निसार खान (३६) याला वांद्र्यातील बेहराम पाडा येथून अटक करण्यात आली आहे.अजीज मोहम्मद हा विकृत असून त्याने जवळपास दोन डझन पेक्षा महिलांना अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान हा मूळचा राहणारा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. तो वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरात पराठ्याचे दुकान चालवतो. त्याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, खान याने मुंबईतील २५ महिलाना अश्लील व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे शरीरीसुखाची मागणी करून त्यांचा छळ करत होता असे समोर आले. खान हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

वांद्रे पूर्व येथील एका ३० वर्षीय गृहिणीला १४ जून रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने ही घटना उघडकीस आली. फोन करणाऱ्याने अश्लील शेरेबाजी केली आणि महिलेने त्याला फटकारले असता त्याने तिला अश्लील ऑडिओ क्लिप पाठवण्यास सुरुवात केली, सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुरूच राहिल्याने तिने आपल्या पतीला याची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी निर्मलनगर पोलिसात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

नवी मुंबईतून पाच बंगलादेशींना अटक

पोलिसांना सापडला ‘मोरावर चोर’, तेलंगणातील यूट्युबरला अटक !

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

रामलला झाले अब्जाधीश, भाविकांनी अर्पण केले ५५ अब्ज रुपये !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) रऊफ शेख यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आरोपी हा मेसेज पाठवण्यासाठी असुरक्षित वायफाय नेटवर्क वापर करीत होता. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील ऑडिओ आणि व्हिडीओ मिळून आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा