29 C
Mumbai
Thursday, April 17, 2025
घरक्राईमनामाबंगालमध्ये बुकी मिथुन चक्रवर्तीची हत्या

बंगालमध्ये बुकी मिथुन चक्रवर्तीची हत्या

आरोपीला मुंबईत अटक

Google News Follow

Related

बंगालमधील बुकी मिथुन चक्रवर्तीची हत्या करून मुंबईत पळालेल्या एकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. रबिउल मिया उर्फ ​​बाबू, (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मूळचा पश्चिम बंगाल मध्ये राहणारा रबिउल याने आपल्या चार सहकाऱ्यासह बुकी मिथुन चक्रवर्ती याची हत्या करून लूट केली होती अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली.
पश्चिम बंगालच्या बंसिहारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक बुकी मिथुन चक्रवर्ती याची पाच जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी बन्सीहारी पोलीस ठाण्याचे भारतीय न्याय सहींता कलम ३३१(८), १०३(२), ३०९(६), ३१०(३), ३१७(३) आणि शस्त्रास्त्र कायदा कलम २५(१अ), १(ब), २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात बन्सीहारी पोलीस ठाण्याने एका आरोपीला अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्यातील एक आरोपी वांद्रे पूर्व येथील गणेश मंदिर रोड परिसरात, खेरवाडी येथे राहत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकाला मिळाली होती.

कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,सपोनि. जितेंद्र शेडगे ,पोलीस कॉन्स्टेबल विनोद भाडले, दीपक खेडकर, धर्मेंद्र जुवाटकर या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून रबिउल मिया उर्फ ​​बाबू याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पश्चिम बंगालमध्ये खून आणि दरोडा केल्याची कबुली दिली.

हे ही वाचा:

संदीप शर्मा कोहलीला पुन्हा ‘मामा’ बनवणार!

चेंबूर येथील गोळीबार प्रकरणात मुख्य शूटर्ससह सूत्रधाराला अटक

जम्मू-कश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे झटके

सुखबीर सिंग बादल पुन्हा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष

रबिउल हा याला अटक करण्यात आली असून तो घटना घडल्यापासून फरार झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून लोणावळा परिसरातील एका बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता. १ जानेवारी २०२५ रोजी तो मुंबईच्या खेरवाडी परिसरात राहायला आला होता. मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल पोलिसांना कळवण्यात आले आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा