राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
या संदर्भात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथकाने पुण्यातील एका गावातून एकाला ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. हा कॉल वरिष्ठ पदावरील अधिकारी यांच्या बदलीच्या संदर्भात करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.
मंत्रालयात बुधवारी आलेल्या एका फोनमुळे खळबळ उडाली होती, हा कॉल राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्या नावाने आणि त्याचा हुबेहूब आवाज काढून करण्यात आला होता. कॉलकर्त्याने पवार यांचा हुबेहूब आवाज काढून सिल्व्हर ओक वरून बोलत असल्याचे सांगून वरिष्ठ पदावरील अधिकारीच्या बदलीच्या संदर्भात बोलणे करण्यात आले. मात्र कॉल संदर्भात संशय आल्यामुळे फोन घेणाऱ्या ज्येष्ठ अधिकारी यांनी सिल्व्हर ओक या ठिकाणी खात्री केली असता पवार साहेबांनी मंत्रालयात फोनच केला नसल्याचे समोर आले.
शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून कॉल केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात सिल्व्हर ओक बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस शिपायाने तक्रार दाखल केली. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा:
रिझर्व्ह बँकेचा एटीएम बाबत मोठा निर्णय
मोदी सरकारने आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी
नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणाचे झाले ‘कल्याण’
गंभीर प्रकार असल्यामुळे हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आणि खंडणी विरोधी पथकाने मंत्रालयात आलेल्या कॉलची माहिती काढून रात्री पुण्यातील जेऊर येथून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या कॉल संदर्भात गावदेवी पोलिसानी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच्या संगीतले असून या संदर्भात तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.