अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

कोपरखैरणे काही नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये दिनेश चव्हाण या २५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सदर मृत्यूची नोंद ही अपघाती मृत्यू अशी केलेली आहे. घडलेल्या प्रसंगासंदर्भात बोलताना, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले की, गुरुवारी अपरात्री तो सेक्टर १९ येथून जात असताना त्याला चोर समजून तेथे उभ्या असलेल्या काही जणांनी बेदम मारहाण केली.

हा आरडाओरडा ऐकून लोकही जमले त्यांनीही चोर समजून त्याला मारहाण केली. जमावाने रस्त्यावर पडलेले बांबू तसेच दगडांनी त्याला मारले. संतप्त जमावाने खूप मारल्यामुळे काही वेळातच दिनेश चव्हाण याला उलटी व जुलाब सुरू झाले. पोलिस स्टेशनमध्ये थोडा वेळ खुर्चीत बसला असता तो अचानक कोसळला. पोलिसांनी त्याला मनपा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले.

वास्तविक मयत चव्हाण नक्की चोरच होता की नाही या तपास सुरू आहे. काही जागरूक नागरिकांनी याबाबत पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली त्यामुळे काही वेळातच कोपरखैरणे पोलीस घटनास्थळी पोहचले व तेथील काही व्यक्तींची मदत घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याला पोलीस ठाण्यात नेल्यावर ठाणे अंमलदार कक्षात बसवण्यात आले. मात्र एवढी मारहाण झाल्यावर त्याला रुग्णालयत अगोदर घेऊन जाणे गरजेचे होते. त्यातच पोलीस ठाण्यात त्याचा मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचा:

फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’

मुंबई पोलिसांना सेटलमेंटचे आदेश?

ड्रग्स तस्करांनी केला एनसीबी अधिकाऱ्यांवरच हल्ला

जम्मू काश्मीरमधून ४ दहशतवाद्यांना अटक

याविषयी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चार तासापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक सुरू आहे. त्यामुळे सरसकट सर्वांना पोलीस ठाण्यात येण्यास मनाई केली गेली आहे. अन्य तक्रादारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद उमटू शकतात म्हणून राखीव पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Exit mobile version