अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

धारावीत या घटनेबद्दल जनक्षोभ

अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या अरविंद वैश्य या हिंदु युवकाची काही जिहाद्यांनी चाकू भोसकत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना धारावीत घडली. मंगळवार ३० जुलै रोजी अरविंदची अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी अंतयात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केल्याचे निदर्शनास आले आहे.

अरविंद वैश्यच्या हत्येमागे सात आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप होत असून पोलिसांनी मात्र एफआयआरमध्ये फक्त दोनच आरोपींची नावे नोंदवल्यामुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धारावी पोलीस ठाण्याचा घेराव करून आंदोलन केले होते.

मंगळवारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात राजीव गांधी नगर येथुन धारावी हिंदू स्मशानभूमी येथे अरविंद वैश्य याची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा कैकाया चौकापासून अर्धा किलोमीटरवर गेल्यानंतर अंत्ययात्रेच्या मागच्या भागावर काही धर्मांधांनी इमारतीच्या गच्चीवरून दगडफेक केली. अंत्ययात्रेतील महिलांनी पुढाकार घेऊन त्यांना जेरबंद केले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

विहिंप प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकारादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या लाठीहल्यात बजरंग दलाचे चार कार्यकर्ते जखमी झाले. करण पटेल, रुपेश गाली आणि इतर दोघे अशा चार जखमींना सायन इस्पितळात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले.

हे ही वाचा:

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !

हिंदू कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर धर्मांधांची दगडफेक, धारावीत संताप, लोक रस्त्यावर उतरले

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

पोलिसांची भूमिका संशयास्पद आणि जिहादींना सहकार्य करण्याची दिसून आली. त्यामुळे गृहखात्याने प्रशासनात बसलेले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते शोधून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. असे मोहन सालेकर यांचे म्हणणे आहे.

येत्या रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विराट श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या वतीने प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांनी सकल हिंदू समाजाने या श्रद्धांजली सभेत हजर राहावे असे आवाहनही केले आहे.

Exit mobile version