खाणकाम सुरु असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार गाडले गेले

या दुर्घटनेत झाला २ जणांचा मृत्यू

खाणकाम सुरु असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार गाडले गेले

हरियाणातील नूह (मेवात) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकामचे काम सुरु असतांना झालेल्या स्फोटात डोंगराचा काही भाग कोसळून ढिगाऱ्याखाली ७ मजूर गाडले गेले या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. पण, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. १० वाहनेही ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.

ढिगाऱ्याखाली दबले गेलेले बहुतांश लोक फिरोजपूर झिरका येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लोक खाणकामाशी संबंधित होते. अचानक झालेल्या अपघातामुळे आजूबाजूचे लोक घाबरले आहेत. फिरोजपूर झिरका उपविभागाला लागून असलेल्या राजस्थानमधील बिजास्ना गावात राजस्थान सरकारने खाणकामासाठी लीजधारकांना जागा दिली आहे.

गुरुवारी रात्री उशिरा त्यामध्ये ब्लास्टिंग करून दगड हटविण्याचे काम सुरू असताना अचानक डोंगराचा एक मोठा खडक खाली खाणकाम करत असलेल्या लोकांच्या अंगावर आला. या अपघातात खडकाच्या पायथ्याशी काम करणारे लोक त्याखाली गाडले गेले. अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी चार ते पाच डंपर व अन्य तीन वाहने उभी होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लोक जमा झाले, त्यानंतर लोकांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली .

हे ही वाचा:

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

अपघातात बळी पडलेले बहुतांश मजूर हे फिरोजपूर झिरका उपविभागातील नाहारिका आणि आगोन गावातील रहिवासी आहेत.सध्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. डोंगर कोसळल्याने वाहनेही त्याखाली दबल्याची माहिती मिळाली आहे. अनेक तासांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

Exit mobile version