नितीन गडकरींना धमकीचा फोन… १० कोटी द्या!

सकाळी २१ मार्च रोजी सकाळी दोन वेळेस गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँड लाईनवर धमकीचे फोन आले होते.

नितीन गडकरींना धमकीचा फोन… १० कोटी द्या!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. गडकरींच्या कार्यालयात हा फोन आला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरींचे ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे तिथे आज सकाळी दोन धमकीचे फोन आले आहेत.

याआधीसुद्धा जानेवारी महिन्यात जीवे मारण्याची धमकीचे फोन करण्यात येऊन खंडणीची मागणी करण्यात आली होती. आज ही माहिती मिळताच पोलीस विभागाने पुन्हा जनसंपर्क कार्यालयात तपास सुरु केला असून यावेळी सुद्धा बेळगाव कारागृहातील आरोपी जयेश कंठा यांच्याच नावाचे फोन आल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मागील वेळेस पोलिसांनी तपासाच्या दरम्यान बेळगावच्या कारागृहातून जयेश कंठा या आरोपीला बोलावल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकमध्ये चार पाच दिवस मुक्काम केल्यानंतर पोलिसांचे पथक आता तिकडे गेले आहे. पण या प्रकरणी काही विशेष माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र पोलिसांनी तपास चालूच ठेवला आहे. आज सकाळी २१ मार्च रोजी सकाळी दोन वेळेस गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँड लाईनवर धमकीचे फोन आले होते. या कॉल वरून गडकरींना दहा कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी दिली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

वींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स

या फोन नंतर नागपूर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेमध्ये आता वाढ केली आहे.  जयेश पुजारी हा सध्या बेळगाव तुरुंगात हत्येच्या प्रकरणी शिक्षा भोगत आहे. या आधीसुद्धा त्याने गडकरींच्या नागपूर कार्यालयांत फोनकरून धमकी दिली आहे. या व्यतिरिक्त त्याने तुरुंगातून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना आणि इतरही लोकांना धमकीचे फोन केल्याची माहिती आहे. तर २०१६ साली तो तुरुंग तोडून पळून सुद्धा गेला होता. .

Exit mobile version