हृदयविकाराने त्रस्त होता, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

पोलिसांनी अपमृत्युची केली नोंद, अविवाहित असलेल्या रुग्णाला होता हृदयाचा आजार

हृदयविकाराने त्रस्त होता, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

आजराला कंटाळलेल्या  ४५ वर्षीय रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी  नायर रुग्णालय येथे घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषा, रागावलेल्या चाहत्याने उचलले हे पाऊल

हाजीर हो! २००० कोटींच्या डीलचा आरोप साबीत करो

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

अविनाश सावंत असे या रुग्णाचे नाव असून ८ दिवसापूर्वी त्याला हृदयाचा त्रास होत असल्यामुळे नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अविवाहित असणारा सावंत हा रुग्णालयात दाखल होऊन आठ दिवस होऊन देखील त्याची प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, त्यातच तो जीवनाला देखील कंटाळला होता.

अखेर मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून  उडी घेतली, त्यात गंभीर जखमी झालेला रुग्ण अविनाश याला उपचारासाठी अतिदक्षता विभागात आणले असता डोक्याला गंभीर जा झाल्यामुळे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे पाचे यांनी सांगितले.

Exit mobile version