मुंबईत गोरेगाव येथे मध्यरात्री घडलेल्या एका विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बस डेपोत विश्रांतीसाठी चाललेल्या बसेस एकमेकांवर धडकल्यानंतर त्यातील एक बस रिक्षावर आदळली त्यात रिक्षातील हे दोन प्रवासी मृत्युमुखी पडले.
जॉनी सखाराम, सुजाता पंचकी असे या मृतांचे नाव आहे. मध्यरात्री १.४५ वाजता ही घटना घडली.
या दोन्ही बस पोईसर डेपोतून घाटकोपरला निघाल्या होत्या. बस क्रमांक १८६२ च्या मागे बस क्रमांक १४५३ होती. मध्यरात्री १.४५ वाजता दोन्ही बस निर्धारित स्थळी आल्या तेव्हा बस क्र. १८६२ने ब्रेक दाबला पाठोपाठ असलेल्या १४५३ ने ब्रेक दाबला. पण पावसामुळे रस्ता निसरडा झालेला असल्याने बस क्र. १४५३ पुढच्या बसवर धडकली. त्यानंतर ती बस रिक्षावर आदळली. त्यात रिक्षातील दोन जण गंभीर जखमी झाले.
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
गुलामगिरीसारख्या दुष्कृत्याला प्रोत्साहन दिले त्याबद्दल क्षमा करा!
वरुण सरदेसाई नीतेश राणेंच्या क्रेडीबिलिटीवर बोलतायत
त्यांना पोलिसांनी ट्रॉमा केअर सेंटरला आणले पण जॉनी यांचा पावणेतीनला मृत्यू झाला तर सुजाता यांना अंधेरीतील कोकोळीलबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या पावणेचारला मृत्युमुखी पडल्या. रिक्षाचालकाला दुखापत झाली पण ती फारशी गंभीर नाही. पोलीस यासंदर्भातील अधिक तपास करत आहेत.