ट्रेनमधील प्रवाशांनी मृतदेहासोबत केला ६०० किमीचा प्रवास!

तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधील घटना

ट्रेनमधील प्रवाशांनी मृतदेहासोबत केला ६०० किमीचा प्रवास!

तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान जनरल डब्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेहासोबत ट्रेनच्या प्रवाशांना सुमारे ६०० किमीचा प्रवास करावा लागला आहे.ही गाडी चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जात असताना एका प्रवाशाच्या मृत्यू झाला होता.

तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात एका प्रवासाच्या प्रवासा दरम्यान मृत्यू झाला.प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याची सूचना दिली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी कानाडोळा करत मृतदेह उत्तर प्रदेशच्या झाशीला पोहोचेपर्यंत ट्रेनमधून काढलाच नाही.झाशीला पोहोचल्यानंतर तेथील रेल्वे पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा:

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे

आसाममध्ये रंगणार ‘जाणता राजा’चे प्रयोग

रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

रामजीत यादव (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मृत रामजीत यादव हा मूळ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील असून तो चेन्नई येथे कामाला होता.तो आजारी असल्याने त्याच्या सोबत आलेला त्याचा मेहुणा गोवर्धनसोबत तो आपल्या गावी बांदा येथे जात होता.रविवारी ही ट्रेन नागपूरला पोहचली तेव्हा रामजीत यादवची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मेहुणा गोवर्धन म्हणाला की, रामजीत यांच्या मदतीला धावून गेलो, त्यांचा जीव वाचावा यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु वाचवू शकलो नाही, असे गोवर्धनने सांगितले.

रामजीत यांचा अचानक मृत्यू झाल्याने ट्रेन मधील प्रवाशांना देखील त्याच्या मृतदेहासोबत ६०० किमीचा प्रवास करावा लावला.रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली पण त्यांनी कानाडोळा केल्याचे गोवर्धनने सांगितले.त्यानंतर गाडी सकाळी भोपाळला पोहचली तेव्हा देखील रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, पण याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी ट्रेन झाशीला पोहोचल्यावरच रामजीत यादवचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे गोवर्धनने सांगितले.

 

Exit mobile version