24 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरक्राईमनामा'प्लेन हायजॅक का प्लॅन है' असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

सहार पोलिसांची मुंबई विमानतळावर कारवाई

Google News Follow

Related

मुंबई विमानतळावरील एका विमानात प्रवाशाकडून हायजॅक हा शब्द ऐकल्यामुळे मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सहार पोलिसांनी संबंधित प्रवाशाला अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. रितेश जुनेजा (वय २३) असे प्रवाशाचे नाव आहे.

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या खासगी कंपनीच्या विमानात एक प्रवासी मोबाइलवरून संशयास्पद संवाद साधत होता. ‘हायजॅक का सारा प्लानिंग हो चुका हैं’ असे वाक्य विमान कंपनीत काम करणाऱ्या नेहा सोनी यांनी ऐकले. सोनी या त्यावेळी विमानामध्ये बसणाऱ्या प्रवशांना मदत करीत होत्या. त्यावेळी २७ क्रमांकाच्या आसनावर बसलेली एक व्यक्ती मोबाइलवर जोरजोरात बोलत होती. ‘अहमदाबादचे विमान सुटण्याच्या तयारीत आहे. काही अडचण असेल, तर मला संपर्क करा. विमानाच्या अपहरणाची योजना आहे. त्याची चिंता करू नये,’ असे हा प्रवासी बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशातील “मोस्ट वॉन्टेड’ लंगूर माकडाला चार तासांच्या शोधमोहिमेनंतर पकडले

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी

पाकिस्तानने पेरलेले दोन डॉक्टर अखेर बडतर्फ; काश्मिरात दोन महिलांचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला

अग्रलेखाची उंची आणि वैचारिक खुजेपणा

त्यानंतर नेहा सोनी यांनी याची माहिती पोलिसांना कळवली. दरम्यान, विमानातील प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण होते. नेहा सोनी यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रवासी रितेश जुनेजा (वय २३) याला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी निष्काळजीपणाचे कृत्य करणे, सार्वजनिक आगळीक निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी जुनेजा याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा