तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह

दोन दिवसांपासून होते बेपत्ता

तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह

तमिळनाडूमधील तिरुनेलवेलीमध्ये शनिवारी एक जिल्हा काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यांचे नाव केपीके जयकुमार धनसिंह असे आहे. त्यांचा मृतदेह एका शेतात आढळला. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. धनसिंह यांनी नुकताच त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. धनसिंह हे काँग्रेसच्या तिरुनेलवेली (पूर्व) युनिटचे प्रमुख होते. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी तीन विशेष पथकांची स्थापना केली आहे. या दरम्यान तमिळनाडू काँग्रेस समितीचे प्रमुख सेल्वापेरुन्थागई यांनी पक्षाच्या सहकाऱ्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हातपाय तारांच्या सहाय्याने बांधलेले होते. जयकुमार यांचा मुलगा जाफरीन याने शुक्रवारी त्याचे वडील गुरुवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. जयकुमार यांनी तिरुनेलवेली पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून असा दावा केला होता की त्यांना आर्थिक वादातून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि रात्रीच्या वेळी त्यांना त्यांच्या घराभोवती काही संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसल्या होत्या. त्यांनी या पत्रात त्यांच्याशी आर्थिक वाद होते, अशा व्यक्तींची नावे आणि फोन नंबरही नमूद केले होते. त्यात जिल्ह्य़ातील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

किराणा दुकानात विकत होता ड्रग्ज; पोलिसांकडून ४ कोटी ५० लाख ७० हजारांचे ड्रग्ज जप्त

सलमान खान हल्ला प्रकरणी आरोपीच्या आत्महत्येबाबत कुटूंबीय न्यायालयात

‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’

राज्यातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर निशाणा साधला असून कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा दावा केला आहे. ‘राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा जळालेला मृतदेह हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघाडाचे द्योतक आहे. तामिळनाडूमध्ये असामाजिक घटक कोणतेही कृत्य करण्याचे धाडस करतात. कायदा किंवा पोलिसांचा धाक नसताना द्रमुक सरकार झोपेत आहे,’ अशी टीका अण्णाद्रमुक पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री इडाप्पाडी पलानीस्वामी यांनी केली. तर, या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले.

Exit mobile version