नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

नवी मुंबईत शनिवार, ११ जून रोजी एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईतील जिमी पार्क इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेमध्ये इमारतीमधील काही भाग कोसळून सहाव्या मजल्यापासून ते थेट तळमजल्यापर्यंत आला. त्यानंतर एक मोठं भगदाड पडलं आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नेरूळ सेक्टर १७ येथील शनीमंदिराजवळ जिमी पार्क नावाची इमारत आहे. त्या इमारतीमधील एका बाजूचा संपूर्ण भाग दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान कोसळला. सहाव्या मजल्यापासूनचा भाग कोसळून तळ मजल्यापर्यंत आला. या दुर्घटनेची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील इतर इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

हे ही वाचा:

“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

प्रयागराजमध्ये हिंसाचारानंतर ६८ जणांना अटक

संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. इमारतीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारीतमधून आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी चार जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ही संपूर्ण इमारत रिकामी करण्याचं काम सध्या सुरू आहे. मान्सून दाखल होताच ही दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version