म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!

यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला होता.

म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!

कुख्यात गुंड अरुण गवळी खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. चार दिवसांसाठी अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या सुरक्षेशिवाय गवळी तुरुंगातून बाहेर येणार आहे. यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला होता.

१७ नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचे मुंबईत लग्न आहे. यासाठी अरुण गवळीकडून पॅरोलची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. या पॅरोलमध्ये पोलीस सुरक्षेसह अरुण गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आली होती. त्यामुळे याविरोधात अरुण गवळीने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता पोलिसांच्या सुरक्षेशिवाय अरुण गवळीला मुंबईला जाता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यापूर्वीही अनेकवेळा तुरुंगाबाहेर आला होता. मुलाचं आणि मुलीचं लग्न, आजारपण अशी कारणे देत तो आतापर्यंत बाहेर आला आहे.

हेही वाचा :

जलतरणपटू स्वप्नील,अविनाशला ‘अर्जुन’ आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक लाड यांना ‘द्रोणाचार्य’

हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती

गुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा

लव्ह जिहादची शिकार ठरलेल्या मुंबईतल्या श्रद्धाचे त्याने केले ३५ तुकडे

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमध्ये कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Exit mobile version