25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामामुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात

Google News Follow

Related

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूंना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना पुण्यातील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं.

विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या ७० वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. जागेबाबत कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बिल्डर बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणलं.

परांजपे बंधूंसह चार जणांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम ४७६, ४६७, ६८, ४०६, ४२०,१२० ब अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोटी कागदपत्र बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. बिल्डर श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना ताब्यात घेऊन विलेपार्ले पोलीस पुढील तपास करत आहेत.

नुकतंच पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला अटक केली होती.

हे ही वाचा:

दक्षिण मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

गुंतवलेल्या रकमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात लंकडविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा