परमबीर यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

परमबीर यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आज ठाणेनगर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर झाले. परमबीर हे स्वतः कोर्टासमोर हजर झाल्याने ठाणे कोर्टने जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी चौकशीत सहकार्य करण्याची हमी दिली आहे.

परमबीर सिंग हे आज (२६ नोव्हेंबर) सकाळीच आपल्या वकीलासह ठाण्यात दाखल झाले होते. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंग हे एक आरोपी असून या प्रकरणात परमबीर सिंग यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती. डीसीपी अविनाश अंबुरे यांनी परमबीर सिंग यांची चौकशी केली.

हे ही वाचा:

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

क्रिकेट बुकी सोनू जलान याने ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली होती. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात यावे, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर यांना फरार घोषित केले होते. परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. तसेच या ३० दिवसांमध्ये परमबीर हे न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर, त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार होती.

काल पराबीर हे मुंबईत दाखल होऊन मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. दरम्यान त्यांची तब्बल साडे सहा तास चौकशी करण्यात आली.

Exit mobile version