परमबीर सिंग हेच नंबर वन; एसीपी संजय पाटील यांचा जबाब  

परमबीर सिंग हेच नंबर वन; एसीपी संजय पाटील यांचा जबाब  

गुन्हे शाखेने आज (४ डिसेंबर) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याविरोधात पहिले दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसीपी संजय पाटील यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याविरोधात जबाब दिला आहे.

एसीपी संजय पाटील यांच्या जबाबाप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझे यांनी त्यांना सांगितले होते की, एक नंबर म्हणजे परमबीर सिंग हेच आहेत. या आधी वाझे यांनीही जबाबात हेच म्हटले होते आणि आता एसीपी संजय पाटील यांनीही जबाबात असेच म्हटले आहे.

हे ही वाचा:

दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेच्या हाती ६९ ऑडिओ क्लिप्स लागल्या असून त्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहेत. या सर्व ऑडिओ क्लिप्स एका पेनड्राईव्हमध्ये एकत्र करून त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने मुंबई पोलीस दलातील आतापर्यंत सात पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

अधिकाऱ्यांनी या जबाबात सचिन वाझे हे खंडणी रॅकेट कसे चालवत होते, कोणावर कारवाई करायची किंवा कोणावर नाही यासंबंधी सर्व माहिती वाझे देत असत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबईतल्या बुकींची नावे आणि माहिती सचिन वाझे यांनी काही अधिकाऱ्यांकडे मागितली होती आणि त्या यादीमधील काही बुकींवर कारवाई करू नये, अशा सूचना वाझे यांनी दिल्या होत्या, असे समोर आले आहे.

Exit mobile version