मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हे शाखेतर्फे केलेल्या अर्जाला मंजुरी दिली आहे.
गोरेगाव वसुली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आता या आदेशाची प्रत परमबीर यांच्या सर्व संपत्ती व मालमत्तांवर चिकटविण्यात येईल. त्यात मुंबई व चंदीगढ येथील मालमत्तांचा समावेश असेल. त्यानंतर ३० दिवस प्रतीक्षा केली जाईल. त्या ३० दिवसांच्या काळात जर परमबीर न्यायालयासमोर हजर राहिले नाहीत तर त्यांना औपचारिकपणे फरार घोषित केले जाईल. ३० दिवसाच्या आंत परमबीर सिंह हे हजर न झाल्यास त्यांची संपती ज्प्त केली जाणार आहे आणि नंतर त्यांना कोणतीही कायदेशीर मदत मिळू शकणार नाही.
मुंबई गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणाऱ्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंग, सचिन वाजे, रियाज भाटी, अल्पेश पटेल, विनय सिंह सह सहा आरोपी आहेत. याप्रकरणात गुन्हे शाखा कक्ष ११ ने सचिन वाजे,अल्पेश पटेल सह तिघांना या गुन्हयात अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपी परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह हे तिघे मिळून येत नसल्यामुळे गुन्हे शाखेने किल्ला न्यायालयात गेल्या आठवड्यात या तिघांना फरार घोषित करण्यात यावे म्हणून अर्ज दाखल केला होता.
हे ही वाचा:
महात्मा गांधींनी कधीही भगतसिंह, नेताजी बोस यांना पाठींबा दिला नाही
भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेने केली एक कोटींची उधळपट्टी!
‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’
राज्यातील १०४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचे आमरण उपोषण
या अर्जावर बुधवारी न्यायालयाने निर्णय देत परमबीर सिंग सह तिघांना फरार घोषित केले आहे. तसेच ३० दिवसात हे तिघे हजर न झाल्यास त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येईल असे सांगण्यात आले. हॉटेल मालक बिमल अगरवाल यांनी केलेल्या तक्रारीवरून या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. अगरवाल यांनी तक्रार केली होती की, परमबीर आणि वाझे यांना त्याच्याकडून ११ लाखांची रोकड आणि दागिने खंडणी रूपात घेतले होते.