परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचे आदेश परमबीर सिंग यांनी स्वीकारले नसल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र निलंबनाच्या कारवाईचे आदेश पत्र परमबीर सिंग यांनी स्वीकारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गृहविभागातील सूत्रांनी परमबीर सिंग यांनी निलंबनाचे आदेश स्वीकारले असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई ठाण्यात खंडणीचे पाच गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यावर गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. गृहविभागाने केलेल्या या कारवाईचे आदेश परमबीर सिंग यांना मान्य नसून ते राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून त्यांनी निलबनाच्या आदेशाची प्रत स्वीकारली नसल्याचे वृत्त शुक्रवारी अनेक वृत्तवाहिन्यानी चालवले होते. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा नसल्यामुळे तसेच परमबीर सिंग हे कुठल्याही पत्रकाराच्या फोनला उत्तर देत नसल्यामुळे अधिकच गूढ वाढले होते.
हे ही वाचा:
एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा
देव आनंद कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील
सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?
अंतराळातही आता झणझणीत, तिखट खाता येणार! वाचा का ते…
मात्र शुक्रवारी रात्री उशिरा गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी परमबीर सिंग यांनी निलंबनाच्या आदेशाची प्रत स्वीकारली असून ते राज्य सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तूर्तास तरी जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. याबाबत सिंग यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.