प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथाबुक्के मारणाऱ्याचे घर केले उद्ध्वस्त

मध्य प्रदेश सरकारने केली कारवाई, जारी केला व्हीडिओ

प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथाबुक्के मारणाऱ्याचे घर केले उद्ध्वस्त

आपल्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथा मारून तिला बेशुद्ध करणाऱ्या पंकज त्रिपाठी या युवकाला मध्य प्रदेश सरकारने शिक्षा केली. त्याचे घरच उद्ध्वस्त करण्यात आले.

या मुलीवर झालेल्या या अत्याचाराची दखल सरकारने गंभीरपणे घेतली आणि ही कारवाई केली. मध्य प्रदेशात असे अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या भूमिकेचे स्वागत होत आहे.

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मऊगंज येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाने आपल्या प्रेयसीला जबर मारहाण केल्याचा व्हीडिओ शेअर केला. हा व्हीडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. पण त्यावर कारवाई झाली नव्हती. या मुलीने त्याला लग्नासाठी विचारल्यावर त्याने संतापून तिला मारहाण केली. त्याने मुलीचे डोके खाली आपटले आणि तिच्या चेहऱ्यावर लाथा मारल्या. त्यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली. त्याच्या मित्राने हा व्हीडिओ शूट केला. पोलिसांना ही घटना नंतर समजली आणि त्यानी कारवाई केली. पण उशीरा झालेल्या या कारवाईबद्दलही लोकांमध्ये नाराजी आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी

अवघ्या ९ आणि ६ वर्षांच्या जोरावर आणि फतेहसिंह यांनी धर्मासाठी त्यागले प्राण

बाळासाहेबांच्या ठायी असलेला विश्वास उद्धव ठाकरेंकडे नाही !

खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक…सुमाचा अचूक ‘वेध’

 

पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांमध्ये प्रेम असल्याचे दोघांच्या कुटुंबांकडून समोर आले आहे.

असाच एक प्रकार नवी मुंबईतही उघडकीस आला होता. रियाझ खान याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात उर्वी वैष्णव या मुलीला ओढले आणि तिने लग्नाची मागणी करताच तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह नदीत फेकला. पण तिच्या सँडलवरून या मृत्युचा छडा पोलिसांनी लावला आणि रियाझ खानला अटक केली आहे. आफताब-श्रद्धा वालकर हे प्रकरण तर सध्या गाजतेच आहे. त्यातही हेच कारण समोर आले आहे.

 

Exit mobile version