पंचाने केली नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

पंचाने केली नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या छापेमारीत जे पंच तिथे उपस्थित होते, त्यांची नावे उघड केल्याप्रकरणी एका पंचाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दादरच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात हा तक्रार अर्ज या पंचाने दाखल केला असून त्यापुढील कारवाई आता सुरू होईल.

या तक्रारीत त्याने गुन्हयात पंच असल्यामुळे आमचे नाव आणि पत्ता उघड केल्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकार परिषदा घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर टीका केली आहे. तसेच या छापेमारीत सहभागी असलेल्या अनेकांची नावे त्यांच्या फोटोसह पत्रकारांसमोर जाहीर केली आहेत. त्यामुळे या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पंचाने ही तक्रार केली असण्याची शक्यता आहे.

क्रूझवर घालण्यात आलेल्या छाप्यात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर नवाब मलिक हे अधिक आक्रमक झाले असून त्यांनी एनसीबी आणि त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

 

हे ही वाचा:

माजी गृहमंत्री अनिल देशमुख : ‘बेपत्ता होणे’ शोभते का ?

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

पुणे विमानतळ बंद; त्यामुळे प्रवाशांचा तळ मुंबईत

‘पवार कुटुंब जनतेला लुटत आहे’

 

भाजपाचे या छापेमारीशी संबंध असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. भानुशाली, गोसावी या दोन जणांचा उल्लेख करत त्यांचा एनसीबीशी काय संबंध असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. परवा आणखी एकदा पत्रकार परिषद घेत त्यांनी फ्लेचर पटेल या व्यक्तीचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्यावर टीका केली आणि समीर वानखेडे योग्य काम करत असल्याबद्दल सुनावले.

 

Exit mobile version