पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे

शिंदे फडणवीस सरकारने पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिंदे सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावाने साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी होती. नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

दोन वर्षपूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा देशात कोरोनाचे थैमान होते. या हत्याकांडानंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. १६ एप्रिल २०२० रोजी रात्री सुशीलगिरी महाराज (३५) आणि कल्पवृक्ष गिरी महाराज (७०) आणि चालक नीलेश तेलगडे (३०) हे देशव्यापी कारमधून कांदिवलीहून सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी गडचिंचिल गावात चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?

डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात

गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली

… म्हणून सुरक्षा कवच सोडून जनतेला भेटायला गेले पंतप्रधान मोदी

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण सीआयडी-गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. मात्र या तपासावर शंका उपस्थित करत संबंधित साधूंच्या कुटुंबियांना या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली होती.

Exit mobile version