पंजाबमध्ये चार दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाकिस्तानच्या आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्युलचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

पंजाबमध्ये चार दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाकिस्तानच्या आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. पंजाब पोलिसांनी रविवारी चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, एक आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस), दोन पिस्तुल आणि ४० काडतुसे जप्त करण्यात आली. पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

पंजाब पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आणि पाक-आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कॅनडास्थित अर्श डल्लाशी संबंधित ४ मॉड्यूल सदस्य आणि स्ट्रेलियास्थित गुरजांत सिंग यांना अटक केली असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून दिल्ली पोलीसांनी अगोदरच सज्जता ठेवली आहे. राजधानीत कडक सुरक्षा करण्यात येत असून शहरातील संभाव्य दहशतवादी मॉड्यूल आणि “असामाजिक तत्वांवर” बारकाइने लक्ष असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

दिल्लीच्या ८ सीमेभोवती कडक सुरक्षा

पोलिसांनी माहिती दिली की त्यांनी दिल्लीच्या सर्व आठ सीमांवर तसेच शहरातील गजबजलेल्या बाजारपेठांवर सुरक्षा आणि दक्षता कडक केली आहे. लाल किल्ल्याजवळील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version