तीन पाकिस्तानी घुसखोर ठार; १८० कोटींचे हेरॉईन जप्त

तीन पाकिस्तानी घुसखोर ठार; १८० कोटींचे हेरॉईन जप्त

आज ६ फेब्रुवारी रोजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करत तीन पाकिस्तानी तस्करांना गोळ्या घालून ठार केले आहे. हे तस्करी ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडून जवानांनी हेरॉईनची ३६ पाकिटे जप्त केली आहेत. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १८० कोटी रुपये आहे.

आज पहाटे, बीएसएफ जम्मूच्या सतर्क जवानांनी सांबा आंतरराष्ट्रीय सीमेवरून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन पाक तस्करांना ठार केले. अंमली पदार्थांची ३६ पाकिटे म्हणजेच अंदाजे ३६ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. अशाप्रकरे जवानांनी मोठ्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पहाटे अडीच वाजता बीएसएफला तस्करांची हालचाल दिसली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात तीन तस्कर ठार झाले आहेत, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक एसपीएस संधू यांनी सांगितले आहे. घटनास्थळावरून हेरॉईन असल्याचा संशय असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

‘लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या’

२८ जानेवारी रोजी, बीएसएफ पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात भारत- पाक सीमेवर पाकिस्तानी तस्करांसोबत गोळीबार झाला. तेव्हा त्यांच्याकडून ४७ किलो हेरॉईन, दोन पिस्तूल काही दारूगोळा आणि अफूची सात पाकिटे जप्त करण्यात आली होती. या चकमकीत बीएसएफचा एक जवान जखमी झाला. गुरुदासपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नानक सिंग यांनी पीटीआयला फोनवरून ही सर्व माहिती सांगितली आहे.

यापूर्वी ३१ जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालताना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले होते. तसेच तीन मासेमारी नौका जप्त केल्या होत्या. बीएसएफने पाकिस्तानी मासेमारी नौकांच्या हालचाली पाहिल्या होत्या, ज्यामध्ये चार-पाच मच्छीमार होते. खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ते भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.

Exit mobile version