पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

अन्सारीने २०१५ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारताला भेट दिली. कोविड लॉकडाऊननंतर त्याचा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे मुक्काम वाढवला होता

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणाला विशेष विभागाने अटक केली आहे. तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.मोहम्मद अमन अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अन्सारी विरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ आणि पासपोर्ट कायद्याच्या कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष शाखेच्या परदेशी नागरिक पडताळणी विभागाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अन्सारी हा पाकिस्तानी नागरिक असून शहरात अवैधरित्या राहत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण  तालीम चौक परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.  आरोपी भवानी पेठेतील चुडामण तालीमजवळ २०१५ पासून राहत असल्याची माहिती आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची आई भारतीय असून वडील कराचीमध्ये राहणारे पाकिस्तानी नागरिक आहेत.

अन्सारीने २०१५ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारताला भेट दिली आणि कोविड लॉकडाऊननंतर त्याचा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे मुक्काम वाढवला होता . अन्सारीची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट सापडला. अन्सारीने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवला आहे. अन्सारी पुण्याहून दुबईला गेल्याचे तपासात उघड झालायचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

अन्सारीला बेकायदा वास्तव्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे . या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अन्सारीच्या बेकायदेशीर वास्तव्यामागे काय हेतू होता आणि तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे का? या संदर्भात चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश तरे करीत आहेत.

Exit mobile version