रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणे माझ्यावरही हल्ला होऊ शकतो

रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

सॅटेनिक वर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार झाले. यादरम्यान, लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक मोठा दावा केला आहे.

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणे माझ्यावरही हल्ला होऊ शकतो, असे तस्लिमा म्हणाल्या आहेत. पाकिस्तानी धर्मगुरू अल्लामा खादिम हुसेन रिझवी यांना माझी हत्या करायची होती. पाकिस्तानी अतिरेक्यांना रिझवी यांनी मला ठार मारण्यास सांगितले होते, असा दावा तस्लिमा नसरीन यांनी केला आहे. बांगलादेशात जन्मलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कथित इस्लामविरोधी वक्तव्याबद्दल यापूर्वी अनेक फतवे जारी केले गेले आहेत.

तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तस्लिमा यांनी ट्विटरवर धार्मिक नेत्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले की, या मौलवीला मला मारायचे होते आणि त्याने लाखो पाकिस्तानी अतिरेक्यांना इस्लामच्या नावावर मला मारण्यासाठी प्रेरित केले आहे. त्या मौलवीने असा दावा केला की, त्याने माझे पुस्तक वाचले आहे पण तो खोटं बोलत आहे.

हे ही वाचा:

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

११९० च्या दशकाच्या सुरुवातीस, तस्लिमा यांनी त्यांच्या कादंबरीतून जगाचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावेळी त्यांच्या लेखनाचे खूप कौतुक झाले. अयोध्या बाबरी विध्वंसानंतर, तस्लिमा यांची प्रसिद्ध कादंबरी ‘लज्जा’ प्रकाशित झाली. त्यावेळी तस्लिमा यांना बांगला देशातून हाकलून देण्यात आले. त्यांच्या अनेक कादंबर्‍याही प्रकाशित झाल्या ज्यात त्यांनी इस्लामबद्दलचे त्यांचे मत सांगितले आहे. एका वर्गाने त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले तर दुसऱ्या वर्गाला या लिखाणाचा राग आला. बांगलादेशातही तिच्याविरोधात फतवा काढण्यात आला होता. त्याच्यावरही हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.

Exit mobile version