एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या डायरीमधून सापडले पाकिस्तानी नंबर

पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आरोपानंतर केलेली कारवाई

एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या डायरीमधून सापडले पाकिस्तानी नंबर

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद दहशतवाद षडयंत्र प्रकरणी १२ डिसेंबरला पाच राज्यांमध्ये १९ ठिकाणी शोध घेतला. जम्मू- काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. यात महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावतीमध्येही धाडी टाकण्यात आल्या. या कारवाई दरम्यान एनआयएने दोनही ठिकाणांहून एक एक तरुणांना ताब्यात घेतले. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले दोन्ही तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे.

कारवाई दरम्यान एनआयएच्या हाती अनेक संशयास्पद कागदपत्रे, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, सीडी, हार्ड डिस्कसह अन्य उपकरणे हाती लागली आहेत. एनआयएकडून गुरुवारी जैश-ए-मोहम्मदचा संशयित दहशतवादी शेख सुल्तान सलाह उद्दीन उर्फ अयूबी याच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. अयूबीला याआधीच अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेशी निगडित प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप आहे. युवकांना संघटित करून कट्टरपंथी बनवणे आणि दहशतवादी संघटनेत भरती करणे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

अमरावतीच्या छायानगर परिसरातून एनआयएच्या पथकाने ३५ वर्षीय मुसाईद याला ताब्यात घेतले होते. तर, भिवंडीमधून कामरान अन्सारी (वय ४५ वर्षे) याला ताब्यात घेतले होते. हे तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात येत आहे. मुसाईदच्या घरी छापेमारी केल्यावर काही पुस्तके, डायऱ्या सापडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डायरीमध्ये काही पाकिस्तानी नंबरही आढळून आले आहेत. ज्या डायरीत पाकिस्तानी नंबर आहेत ते नातेवाईकांचे असल्याचा दावा घरच्यांनी केला आहे. मागील काही महिन्यांपासून मुसाईब परफ्यूमचा व्यवसाय करत असल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे.

हे ही वाचा :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी देश एकजुटीने उभा

गुकेश ठरला ६४ घरांचा सर्वात तरुण विश्वविजेता!

दुसरीकडे, आसामच्या गोलपारा, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, उत्तर प्रदेशातील झांशी, बरेली, देवबंद, सहारनपूर, बिहारमधील सीतामढी, पश्चिम बंगालमधील हुगली, जम्मू काश्मीरमधील बारामूला, रियासी, बडगाम, अनंतनाग, राजस्थानमधील डुंगरपूर आणि गुजरातमधील मेहसाणा येथे एनआयएच्या पथकाने छापेमारी केली आहे.

Exit mobile version