प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

वक्फ विरोधी निदर्शनादरम्यान घोषणा देतानाचा व्हिडीओ व्हायरल

प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याला विरोध अजूनही सुरूचं असून अशाचं एका वक्फ विरोधी निदर्शनादरम्यान लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची बाब समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी वक्फ कायद्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळला होता. जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या आणि हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा वक्फ विरोधी निदर्शनादरम्यान लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये वक्फ विरोधी निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण जमले होते. यावेळी हातात फलक घेऊन रॅली काढण्यात आली. या निदर्शनादरम्यान हे तरुण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देताना दिसून आले. या रॅलीचा व्हिडीओ समोर आला आहे.

एकीकडे पाक समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांना ठार केले. यासाठी संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर, पाकिस्तानवरही टीका केली जात आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक

दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधादरम्यान पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात निदर्शकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले, पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहने जाळली होती तेव्हा हिंसाचार अधिक उसळला. हिंसाचार फक्त मुर्शिदाबादपुरता मर्यादित नव्हता तर मालदा, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यांमध्येही पसरला होता.

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा... | Dinesh Kanji | Robert Vadra | Pahalgam Attack |

Exit mobile version