भिवंडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना अटक

दोलन करणाऱ्या १९ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

भिवंडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना अटक

भिवंडीत मेरी पाठशाला संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात धक्कादायक घटना घडली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर गदारोळ झाला.

आंदोलन करणाऱ्या १९ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शालेय शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला . त्यामुळे मेरी पाठशाला या संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक शाळेबाहेर आंदोलन करत आहे.

हे ही वाचा:

ही औरंगजेबी चाल तर नाही? शिवसेनेची वाटचाल टकमक टोकाकडे?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे

गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले आहे. मात्र या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हा प्रकार सोमवारी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या घटनेप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी मेरी पाठशाला या संस्थेच्या सदस्यांविरोधात आणि आंदोलनात सहभागी झालेल्या काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली . यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली . पोलिसांनी आतापर्यंत १४ पुरुष आणि ५ महिलांसह १९ जणांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version