पाकिस्तानमध्ये पुन्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार; दोन शीखांना घातल्या गोळ्या !

दोन दिवसांत शहरातील दुसरी घटना ,शिखांना केलं जातंय 'टार्गेट'

पाकिस्तानमध्ये पुन्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार; दोन शीखांना घातल्या गोळ्या !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर नेहमीच अत्याचार होत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक शिखांना लक्ष करण्यात आले आहे. गेल्या ४८ तासात दोन दुकानदारांवर गोळ्या घालण्यात आले असून त्यात एकाचा मृत्य झाला आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार काही नवीन नाहीत.अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर पाकिस्तान नेहमी तोंड बंद ठेवण्याचं काम करत आहे. भारत दररोज अशा घटनांचा मुद्दा उपस्थित करत आहे. गेल्या दोन दिवसात पाकिस्तानमध्ये दोन शीख दुकानदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृत मनमोहन सिंग (३२) याची शनिवारी पेशावर मधील रशीदगर्दी मार्केटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

या आधी देखील शुक्रवारी दुकानदार तरलोक सिंग याच्यावर अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या होत्या. मात्र या घटनेत त्याचा जीव वाचला होता. मनमोहन सिंग हे रशीदगर्दी मार्केट येथे किराणा दुकान चालवत होते. ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक शीख समुदायाचे सदस्य बलबीर सिंग यांनी सांगितले की, मनमोहन दुकान बंद करून घरी जात होते. तो ऑटोमध्ये बसल्यानंतर दोन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि घरी जाताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. “तो एका ऑटोने घरी जात असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्याचा जागीच मृत्यू झाला,” बलबीर म्हणाला.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

‘विरोधी पक्षांच्या एकजुटीनेही’; ‘भाजपचे नुकसान नाही’!

‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!

मनमोहनला दिव्यांग भाऊ आणि एक बहीण आहे. याशिवाय त्यांना एक मुलगा ही आहे. मनमोहनच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर अवलंबून होती. पाकिस्तानातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली जाईल,असे युनायटेड शीखच्या वतीने सांगण्यात आले आहे. शीख समुदायने या घटनेवर म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये शिखांवर होत असलेल्या अत्याचारमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. हे हल्ले भयावह आहेतच पण मानवी हक्कांचे ही उल्लंघन आहे. पाकिस्तान सरकारने असे हल्ले रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. पीडितांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.

१९४७ मध्ये फाळणी झाल्यापासून शीख समुदाय पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक म्हणून राहत आहेत.या घटनेची चौकशी होऊन त्वरित हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे ,असे शीख समुदायने म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, जे लोक काबाड कष्ट करून पोट भरतात त्यांच्यावर अशा प्रकारचे भ्याड हल्ले का होत आहेत?,तसेच हे काही षडयंत्र आहे का?,या हल्ल्यांमधून काही संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? अशा प्रकारची माहिती द्या कारण सुमारे ३०० शीख कुटुंबे पाकिस्तानमध्ये राहतात मात्र त्यांना भीतीच्या सावटाखाली आयुष्य जगावे लागत आहे, असे शीख समुदायने म्हटले आहे.

शीख समुदाय सदस्यांवर हल्ला झालेल्या घटना

मार्च २०२३ मध्ये, दीर कॉलनी मार्केटमधील त्याच्या दुकानात अज्ञात हल्लेखोरांनी दयाल सिंग नावाच्या शीख व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. दयाल सिंग यांची हत्या करून हल्लेखोर फरार झाले. १५ मे २०२२ रोजी रणजीत सिंग आणि कुलजित सिंग या दोन शीख पुरुषांची बट्टा ताल चौकात दुकानात बसलेली असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ३० सप्टेंबर २०२१ रोजी, सतनाम सिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या शीख व्यक्तीची पेशावरच्या फरीकाबाद येथे दुकानात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तरलोक सिंग यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याशिवाय, सतनाम सिंग यांच्या हत्येची जबाबदारीही आयएसकेपीने घेतली.

Exit mobile version