पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांपैकी एक असल्याची माहिती

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकाडून दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. तर, या हल्ल्यातील दहशतवाद्यांची रेखाचित्रे आणि नावे जाहीर करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे. अशातच पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे घर काश्मीरमध्ये उध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. हे घर दक्षिण काश्मीरच्या त्राल येथील आसिफ फौजी उर्फ आसिफ शेखचे होते, जो हल्ल्यातील तीन संशयितांपैकी एक होता, अशी माहिती आहे.

जम्मू- काश्मीर पोलिसांनी बुधवारी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली. पोलिसांनी सांगितले की हे रेखाचित्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तयार केले गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे रेखाचित्र आसिफ फौजी उर्फ आसिफ शेख, सुलेमान शाह आणि अबू तल्हा यांचे आहेत. या तिन्ही दहशतवाद्यांना मूसा, युनूस आणि आसिफ अशी कोड नावे देखील होती आणि ते पूंछमधील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होते.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील त्रालमधील मोनाघन भागात लष्कर दहशतवादी आसिफ शेखचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. आसिफ शेख हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांपैकी एक आहे, असे बोलले जात आहे. आसिफ याच्या घरात झडती दरम्यान काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. सुरक्षा दलांना धोका जाणवला आणि त्यांनी सुरक्षिततेसाठी तातडीने घराबाहेर पडताच घरात मोठा स्फोट झाला ज्यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. काही संशयास्पद स्फोटकं पदार्थ होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं; नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी

“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!

मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे. लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर, सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद, हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version