घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर ४० वर्षीय मालकाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना रविवारी गोरेगाव येथे उघडकीस आली आहे. मालकाने एक वेळ नाही तर दोन वेळा हे कृत्य केल्याची तक्रार मोलकरणीने बांगुर नगर पोलिसांना दिली असून पोलीसांनी मालकावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच मालकाने पळ काढला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मोलकरीण ही ३५ वर्षाची आहे. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, उत्तर मुंबईतील गोरेगाव येथील बांगूर नगर भागात तिच्या मालकाच्या घरी तिच्या मालकाने तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला. आरोपीचे कुटुंबीय घराबाहेर असताना लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबाने रविवारी बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेची वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते,असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ४० वर्षीय आरोपीने गेल्या पंधरा दिवसांत सलग दोन दिवस घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला आणि तिला याबद्दल कोणालाही सांगू नको, अन्यथा तिला जीवे मारण्याची धमकी होती, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
वक्फ बोर्डची संपत्ती मुस्लिमांच्या पूर्वजांची
प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षात ४०० कोटींचा कर भरला!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खर्च केले ८६९ कोटी; हाती आले फक्त ५२ कोटी!
श्री कृष्णाने अर्जुनला दिलेल्या शिकवणीमधून दिवसभर उर्जा, शांती, समाधान मिळते
पहिल्या दिवशी आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर, पीडिता घाबरली आणि तिने तिच्या कुटुंबातील कोणालाही घटनेची माहिती देण्याचे टाळले. आरोपीने दुसऱ्या दिवशीही कुटुंबातील सदस्य बाहेर असताना तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिसऱ्या दिवशी कामावर जाण्याचे टाळले. नंतर आरोपीच्या घरी घरकाम तिने सोडले.
शनिवारी, जेव्हा पीडितेच्या कुटुंबाने तिच्या काम थांबवण्याच्या आणि काही दिवस घरी राहण्याच्या निर्णयाबद्दल विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. तिच्या कुटुंबाने वेळ वाया न घालवता बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरू केले आहे.