गुजरातमधून ५५० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना घेतलं ताब्यात

पडताळणी आणि चौकशीनंतर हद्दपारीची होणार कारवाई

गुजरातमधून ५५० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना घेतलं ताब्यात

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच गुजरातमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी आणि बांगलादेशी नागरिकांना शोधून काढण्यासाठी मोठी कारवाई हाती घेण्यात आली होती. या कारवाई दरम्यान पोलिसांना मोठे यश हाती आले आहे. या कारवाईमुळे गुजरातमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५५० हून अधिक बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

गुजरात पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली असून या कारवाईत अहमदाबाद आणि सुरत शहरांमधून अवघ्या काही तासांत ५०० हून अधिक परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात पोलिसांनी विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), गुन्हे शाखा, मानव तस्करीविरोधी युनिट (एएचटीयू) आणि स्थानिक पोलिस युनिट्सच्या सहकार्याने अहमदाबादमध्ये समन्वित छापे टाकले. या कारवाईत पहाटे ४५० हून अधिक संशयित बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून ते देशात राहत होते. पोलिस उपायुक्त (एसओजी) राजदीप सिंग नकुम यांनी सांगितले की, सुरतमध्ये ताब्यात घेण्यात आलेले लोक हे गुप्तचर माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. आता पडताळणी आणि चौकशीनंतर या व्यक्तींना हद्द‌पार करण्यात येईल.

हे ही वाचा : 

पुलवामा, शोपियान, कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे स्फोटकांनी उडवली

पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार

पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना एनएसईकडून १ कोटी रुपयांची मदत!

अहमदाबाद गुन्हे शाखेचे सहआयुक्त शरद सिंघल म्हणाले की, माहिती मिळाली होती की चांडोला परिसरात मोठ्या संख्येने बांगलादेशी राहत आहेत. पोलिसांनी सकाळी शोध मोहीम राबवली. आतापर्यंत ४५७ लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना हद्दपारीची प्रक्रिया सुरू केली जाईल. दरम्यान, सुरत शहरातील एसओजी, डीसीबी, एएचटीयू, पीसीबी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री मोठी शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान १०० हून अधिक बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेले सर्व जण बेकायदेशीरपणे भारतात आले होते आणि बनावट कागदपत्रांसह अनेक वर्षांपासून सुरतमध्ये राहत होते. चौकशीनंतर त्या सर्वांना बांगलादेशला पाठवले जाईल.

भाईचारा हवाय, मग बोलवा त्या काश्मिरी पंडितांना! | Mahesh Vichare | Pahalgam | Kashmir | Pandit |

Exit mobile version