पाकिस्तानात मशीद आणि मिरवणुकीत स्फोट; ५७ ठार!

प्रेषित मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत स्फोट

पाकिस्तानात मशीद आणि मिरवणुकीत स्फोट; ५७ ठार!

पाकिस्तानातील मशिदीजवळ शुक्रवारी दोन ठिकाणी स्फोट झाला आहे.या आत्मघातकी स्फोटात ५७ जण ठार झाले असून जखमींची संख्या जास्त आहे. पहिला स्फोट बलुचिस्तान प्रांतात झाला आणि दुसरा स्फोट खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मशिदीत झाला आहे.या हल्ल्यात ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग येथे प्रेषित मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.याचाच फायदा उचलत दोन्ही आत्मघातकी हल्लेखोरांनी मशिदींना लक्ष्य केले आणि स्फोट घडवून आणला.यास्फोटात आतापर्यंत ५० हुन अधिक ठार झाले आहेत तर जखमींची संख्या जास्त आहे.हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये कर्तव्य बजावणारे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांचा देखील समावेश आहे.

याबाबत मोहम्मद जावेद लेहरी या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट “आत्मघाती स्फोट” होता आणि बॉम्बरने डीएसपीच्या गाडीजवळ येताच स्वतःला बॉम्बने उडविले.जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना क्वेटा येथे हलवण्यात आले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.पहिल्या स्फोटानंतर काही तासांनी दुसरा स्फोट झाला.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका मशिदीवर आत्मघाती बॉम्बरने हल्ला करत दुसरा स्फोट घडवून आणला.या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमले होते, जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा मशिदीत सुमारे ३० ते ४० उपासक उपस्थित होते.स्फोटामुळे मशिदीचे छत कोसळले आणि डझनभर लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.

खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन्ही प्रांत अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहेत, आणि अलीकडच्या काही वर्षांत इस्लामी अतिरेक्यांनी येथे हल्ले वाढवले आहेत.शुक्रवारी झालेल्या दोन्ही स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

Exit mobile version