१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

भारत-बांगलादेश सीमेवर कारवाई

१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

Handcuffs on top of a fingerprint form.

भारतात अवैधरीत्या शिरलेल्या बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी सध्या देशभरात मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये मोहीम सुरू असून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात येत आहे. अशातच सीमा भागातही कारवाईला वेग आला आहे. आकडेवारीनुसार, १३ महिन्यात भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

भारत- बांगलादेश सीमेवर १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या १३ महिन्यांच्या कालावधीत भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ हजार ६०१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान २,६०१ बांगलादेशींना अटक करण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने जानेवारी २०२५ मध्ये १७६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. डिसेंबर २०२४ मध्ये २५३, नोव्हेंबरमध्ये ३१०, ऑक्टोबरमध्ये ३३१, सप्टेंबरमध्ये ३००, ऑगस्टमध्ये २१४, जुलैमध्ये २६७ आणि जूनमध्ये २४७ जणांना अटक करण्यात आली असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. मे २०२४ मध्ये सर्वात कमी ३२ घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ९१, मार्चमध्ये ११८, फेब्रुवारीमध्ये १२४ आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये १३८ जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा..

‘शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यास सांगत असे, भेदभावामुळेच कारकीर्द संपली!

जाफर एक्सप्रेस हायजॅक : विरोधकांच्या टीकेवर पाकिस्तान सरकार गप्प

जम्मू- काश्मीरच्या बांदीपोरामधून शस्त्र साठ्यासह दोन संशयितांना अटक

भारतीय चहाची निर्यात उच्चांकी

दरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षा वाढवली असल्याची माहिती गृह राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच सरकारने सीमेवर देखरेख, मनुष्यबळ आणि तांत्रिक बाबींमध्ये वाढ केली असून याद्वारे भारत- बांगलादेश सीमा सुरक्षा मजबूत केली आहे. सीमेवर सतत गस्त, नाकाबंदी, निरीक्षण चौक्या यामुळे ही या कारवाया करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशसोबत संयुक्त ऑपरेशन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नाईट व्हिजन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, आयआर सेन्सर्स सारखी देखरेख उपकरणे सीमेवर असल्याचे त्यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या टपल्यांनी केलंय हैराण ! | Mahesh Vichare | Nitesh Rane | Malhar Certificate |

Exit mobile version