दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्ट हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलं असल्याचा दावा करत इडीने त्यावर जप्तीची कारवाई केली होती.

सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. याआधी मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून साई रिसॉर्टवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती. ईडीने उच्च न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

ईडीने कारवाई अंतर्गत जवळपास १०.२ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यामध्ये २ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपये किंमतीची जवळपास ४२ गुंठे जमीन आणि ७ कोटी ४६ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे रिसॉर्ट याचा समावेश होता.

साई रिसॉर्टचे बांधकाम हे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. तर, अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावले होते.

हे ही वाचा:

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर, सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे.

Exit mobile version