हल्दवानी हिंसाचारातील सूत्रधार अब्दुल मलिकसह नऊ आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

दिवाणी न्यायालयाने दिले आदेश

हल्दवानी हिंसाचारातील सूत्रधार अब्दुल मलिकसह नऊ आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

उत्तराखंडमधील हल्दवानी हिंसाचारातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. अटक करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हल्दवानी दिवाणी न्यायालयाने हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक, त्याचा मुलगा यासह नऊ आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सर्व नऊ आरोपींवर सीआरपीसी कलम ८२, ८३ अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांनी आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

नैनिताल पोलिस आणि प्रशासनाने आदेशाचे पालन करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. नैनिताल पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यासोबतच पोलीस प्रशासनाने मुरादाबाद आणि बरेली झोनमध्ये ओळखल्या गेलेल्या आरोपींची माहिती शेअर केली आहे. प्रत्येक आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हल्दवानी हिंसाचारानंतर हे आरोपी उत्तर प्रदेशच्या हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हल्दवानी पोलीस आणि प्रशासनाचे पथक दोन झोनच्या पोलिसांची मदत घेत आहे.

हल्दवानी येथे गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणात १८ आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मास्टरमाईंड अब्दुल मलिक, त्याचा मोठा मुलगा अब्दुल मोईद आणि अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. याशिवाय शकील अन्सारी, वसीम उर्फ हप्पा, मौकीन सैफी, एजाज अहमद, तस्लीम, झियाउल रहमान, रईस उर्फ दत्तू हे फरार आहेत.

हे ही वाचा:

टी-२० विश्वचषकाच्या संघाची धुरा रोहित शर्माकडेच!

शरद पवारांची ब्रह्मोस चाचपणी…

पालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले!

हल्दवानी हिंसाचार प्रकरणी पोलिसांची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी सर्व नऊ आरोपींविरुद्धचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. पोलीस अहवालाचा आधार घेत न्यायालयाने कलम ८३ अन्वये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version