श्रद्धा हत्या प्रकरणी तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश

विकास वालकर यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

श्रद्धा हत्या प्रकरणी तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.

मुंबईतील तुलिंज आणि मानिकपूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

आफताब पुनावाला याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर श्रद्धाने मुंबईतील तुलिंज पोलिसांत तक्रार केली होती. परंतु त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आरोपी आफताबच्या आई-वडिलांनी विनंती केल्यामुळे श्रद्धाने तक्रार मागे घेतली होती. याशिवाय श्रद्धा बेपत्ता झाल्यानंतर विकास वालकर यांनी मानिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या अर्जाची कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकाराला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :

एनडीटीव्हीच्या संचालकांत आता अदानींना दोन जागा

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘या’ नेत्याचं नाव

गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रद्धाच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते प्रथमचं माध्यमांसमोर आले होते. आफताब पुनवालाने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबातील त्याचे आई वडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. या कटात इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी विकास वालकर यांनी केली होती.

Exit mobile version