अनिल जयसिंघानीसाठी ‘ऑपरेशन एजे’…पाच पथके आणि पाठलाग

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांनी पाच दिवसांपूर्वी 'ऑपरेशन ए.जे' राबवले

अनिल जयसिंघानीसाठी ‘ऑपरेशन एजे’…पाच पथके आणि पाठलाग

पोलीस अधिकारी यांना लाच देऊन त्यांना अडकवून ब्लॅकमेल करणारा अनिल जयसिघांनी याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पत्नीला अडकविण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे प्रकरण अतीगंभीर झाले होते. मागील ७ वर्षांपासून फरार असणाऱ्या अनिल जयसिघांनी याला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांनी पाच दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन ए.जे’ राबवले. ‘ऑपरेशन ए.जे’ मध्ये गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी अंमलदार मिळून पाच पथके तयार करण्यात आली होती.अनिल जयसिघांनी हा हुशार आणि चतुर होता, तो मोबाईल फोनचा वापर केवळ व्हाट्सएप कॉलिंग व इतर सोशल मीडिया पुरता वापरत असल्यामुळे त्याचे लोकेशन शोधणे अवघड होते.

पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन ए.जे’साठी तयार करण्यात आलेल्या ५ पथकांपैकी दोन पथके मुंबई व इतर तीन पथके मुंबई बाहेर त्याचा शोध घेत होती. अनिल जयसिघांनीच्या मुलीला अटक केल्यानंतर अनिल हा राज्याच्या बाहेर पळून गेला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. शिर्डी तेथून सुरत येथे गेलेल्या अनिल जयसिघांनी याला अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथक सुरतला रवाना झाली, सुरत शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरत येते घेण्यात येत असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच अनिल याने सुरत मधून पळ काढत वडोदरा मार्गे गोध्रा येथे स्वतःच्या खाजगी वाहनातून निघाला होता.त्याच्या मागावर असलेल्या पथकाला त्याचे लोकेशन मिळताच वडोदरा आणि गोध्रा पोलिसांची मदत घेण्यात आली.अखेर ७२तासांच्या पाठलगानंतर अनिल जयसिघांनी याला गोध्रा जवळील कल्लोल गाव येथे गाठून त्याला त्याच्या दोन सहकाऱ्यासह ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी अनिल जयसिघांनी याच्याजवळून मोबाईल फोन्स, इंटरनेट डिव्हाईस, एक हुंदाई मोटार हस्तगत करण्यात आली आहे. सोमवारी अनिल जयसिघांनी याला अटक करून मुंबईत आणण्यात आले असून त्याचा आणि त्याला मदत करणाऱ्या त्याचा वाहन चालक आणि एक नातेवाईक यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

काश्मीरमध्ये गुंतवणुकीचे उबदार वारे, उभा राहतोय भव्य मॉल

आमदार अतुल भातखळकरांचा घणाघात… मराठी शाळांचे वाजताहेत तीन तेरा !

पंजाबमध्ये योगी आदित्यनाथ असते तर गुन्हेगारी संपली असती!

कोण आहे अनिल जयसिघांनी?

असून ७ वर्षांपासून फरार होता.अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे उकळणे त्यांना ब्लॅकमेल करणे असे त्याच्यावर आरोप आहे.अनिल जयसिंघानी हा एक मोठा सट्टेबाज आहे,आयपीएल सामन्यां दरम्यान त्याने अनेक कोटींचा सट्टे घेतले आहे. अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरचा रहिवासी, तो मोठ्या प्रमाणात लाच देऊन पोलिस अधिकाऱ्यांना अडकवतो, रोख रक्कम सुपूर्द करतो आणि नंतर पोलिसांना ब्लॅकमेल करतो. त्याने एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करून तक्रार दाखल केली होती, त्यानंतर या उपायुक्तानी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता.
जयसिंघानी दुबई, कराची आणि दिल्लीतील बेटिंग सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे.अव्वल बुकी बनण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेने तो प्रतिस्पर्धी बुकींची माहिती पोलिसांना द्यायचा आणि त्यांच्यावर छापा टाकायला लावत आहे.

Exit mobile version