25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामा‘हिट अँड रन’ अपघातांतील मृतांपैकी फक्त २०५ जण भरपाईसाठी आले पुढे

‘हिट अँड रन’ अपघातांतील मृतांपैकी फक्त २०५ जण भरपाईसाठी आले पुढे

‘हिट अँड रन’ प्रकरणांसाठी ‘नुकसान भरपाई निधी’ म्हणून ७६ कोटी २० लाख रुपये जमले

Google News Follow

Related

सन २०२२-२३मध्ये एकूण ‘हिट अँड रन’ अपघातांतील केवळ २०५ मृतांच्या नातेवाइकांनी नुकसानभरपाईसाठी दावा केला आहे. तर, केवळ ९५ प्रकरणांत एकूण एक कोटी ८० लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एकूण ११० जणांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत, असे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत आढळून आले आहे.

 

केंद्र सरकारतर्फे अशा अपघातांतील मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये तर, जबर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते. मात्र या नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती लोकांना नसल्याने आढळून आले आहे.

 

दरवर्षी देशभरात हिट अँड रन प्रकरणांत सुमारे २५ हजार जण मृत्युमुखी पडतात. तर, अन्य ४३ हजर जण जखमी होतात. ज्या अपघातात गाडीचा चालक समोरच्याला धडक देऊन घटनास्थळावरून गाडीसह पलायन करतो, त्याला ‘हिट अँड रन’ केस म्हटले जाते. सन २०१९मध्ये केंद्र सरकारने या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत आठपट तर, जबर जखमीला दिल्या जाणाऱ्या भरपाईमध्ये चारपट वाढ केली आहे.

हे ही वाचा:

युएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल

बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग

उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

‘उत्तम’ आणि ‘अंगद’ वाढवणार भारताच्या हवाई दलाचे सामर्थ्य

या वाढीव नुकसानभरपाईसाठी वाहतूक मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२मध्ये मोटर व्हेइकल ऍक्सिडंट फंडची स्थापना केली आहे. हा निधी १ एप्रिल २०२२पासून कार्यान्वित झाला. आधी हा निधी नुकसान भरपाईच्या निधीतून दिला जात असे. या निधीच्या पहिल्या वार्षिक अहवालानुसार, या निधीमध्ये ‘हिट अँड रन’ प्रकरणांसाठी ‘नुकसान भरपाई निधी’ म्हणून ७६ कोटी २० लाख रुपये जमले होते. त्यातील एक कोटी ७० लाख रुपये अशा प्रकारे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना देण्यात आले. तर, जबर जखमी व्यक्तींना चार लाख रुपये देण्यात आले.

 

मार्च महिन्यात वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८-१८ पासून केवळ पाच हजार ३६ हिट अँड रन प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन हजार २०९ जण मृतांचे नातेवाईक आणि एक हजार ८२७ जबर जखमींचा समावेश आहे. दरवर्षी अपघातात मृत आणि जखमी होणाऱ्यांपैकी हे प्रमाण अवघे सहा टक्के आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा