26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाफेसबुकवरील ऑनलाईन कर्जाच्या ऑफरमुळे एकाला ९० हजारांचा फटका

फेसबुकवरील ऑनलाईन कर्जाच्या ऑफरमुळे एकाला ९० हजारांचा फटका

ऑनलाईन फसवणुकीची घटना

Google News Follow

Related

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशाच एका फ्रॉडमुळे एका व्यक्तीला हजारो रुपयांचा फटका बसला आहे. फेसबुकवरील ऑनलाईन कर्जाच्या ऑफरवर विश्वास ठेवल्यामुळे एकाला तब्बल ९० हजारांचा चुना लागला आहे. या व्यक्तीने सध्या पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांकडून याचा शोध घेतला जात आहे.

ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरट्यांकडून नवनवीन शक्कली लढवल्या जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. याच संदर्भात फेसबुक फसवणुकीचे एक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीसोबत फसवणुकीची घटना घडली आहे. फेसबुकवरच्या झटपट कर्जाच्या ऑफरला भुलल्यामुळे त्यांना हजारो रुपये गमवावे लागले आहेत.

एका फेसबुक पोस्टमध्ये २ तासांत ऑनलाईन कर्ज देण्याचा दावा करण्यात आला होता. ही पोस्ट बघून नवी मुंबईत राहणाऱ्या एका लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या कर्जासाठी अर्ज केला होता. ५६ वर्षांच्या एका व्यक्तीने ८ नोव्हेंबरला फेसबुकवर कर्जासंदर्भात एक पोस्ट पाहिली आणि लगेचच कर्जासाठी नोंदणी केली. लोनसाठी अर्ज केल्यानंतर एका फायनांशियल कंपनीच्या प्रतिनिधीचा त्यांना फोन आला.

हे ही वाचा:

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

यावेळी प्रतिनिधीने त्यांना ऑनलाईन लोन मिळवण्यासाठी काही चार्जेस देण्याबाबत सांगितले. इन्शोरन्स चार्ज, जीएसटी, एनओसी चार्ज, आरबीआई चार्ज आणि एडवांस्ड इंस्टॉलमेंट अशा काही गोष्टींची मागणी करण्यात आली. यावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीने समोरच्याला ९० हजार दिले. मात्र, सांगितलेली सर्व रक्कम देऊनही या व्यक्तीला कोणतंच कर्ज देण्यात आलं नाही. जेव्हा लोन चार्जच्या नावाखाली एक्स्ट्रा अमाउंट मागण्यात आली, तेव्हा त्या व्यक्तीला लक्षात आले की, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे. त्यानंतर या व्यक्तीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा