जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यास सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. श्रीनगरमधील हरवान भागात ही चकमक झाल्याची माहिती ‘एएनआय’कडून रविवारी १९ डिसेंबर रोजी देण्यात आली. या चकमकीत लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी मारला गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अद्याप या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
An encounter broke out between security forces and terrorists in Harwan area of Srinagar, early this morning; 1 unidentified terrorist neutralized.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/wuf1OuNJLv
— ANI (@ANI) December 19, 2021
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आज पहाटे चकमक सुरू झाली आणि काही वेळातच सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. हा दहशतवादी लष्कर- ए- तोयबाचा असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
हे ही वाचा:
‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस कार्यकर्ता?
आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?
अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने हरवान परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर ही चकमक घडली असून त्यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कर- ए- तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझिन, पिस्तुलच्या सात राऊंड, एक ग्रेनेड आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.