बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे.

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. शनिवार, २० ऑगस्ट रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

बांदीपोरा येथील पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून AK- 47 रायफल, दोन AK मॅगझिन आणि ५९ AK राऊंड शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद बेग उर्फ ​​इना भाई असे असून तो बेग मोहल्ला बारामुल्ला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोलिसांनी जप्त केला आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रीड दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

दरम्यान, शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रीड दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच त्यांनी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. दहशतवाद्यांनी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. साहिल वानी आणि अल्ताफ फारुख उर्फ ​​आमिर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. १५ ऑगस्ट रोजी गोपाळगोरा येथे अल्पसंख्यांक समुदायावर ग्रेनेड फेकण्याची घटना घडवली होती.

हे ही वाचा:

मुंबई हल्ला धमकी प्रकरणी वसईतून न्हाव्याला घेतलं ताब्यात

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अली हुसैन हा तुरुंगातून कार्यरत होता. दरम्यान, मोहम्मद अली हुसैन याला शस्त्र जप्तीसाठी घटनास्थळी नेले जात होते. त्याचवेळी दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत हुसैन याचा खात्मा करण्यात आला. या कारवाईदरम्यान, एक पोलीसही जखमी झाला होता.

Exit mobile version