संसद भवनाजवळ बुधवार, २५ डिसेंबर रोजी मोठी खळबळ उडाली. संसद भवनाजवळ एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली. यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनास्थळावर पेट्रोलची बाटली मिळाली आहे. त्याचबरोबर पोलिसांना घटनास्थळावर दोन पानांची चिठ्ठी मिळाली आहे. ती अर्धवट जळाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी या व्यक्तीने रेल्वे भवनाजवळील उद्यानात स्वतःला पेटवून घेतले, त्यानंतर तो संसद भवनाकडे धावत सुटला. हे पाहताच पोलिसांनी त्वरित या व्यक्तीला थांबवून त्याला गोधडीने झाकले. तरीही या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनंतर अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. गंभीर अवस्थेत या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गंभीर बाब असून याचं दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हे ही वाचा :
भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने टिपले!
इस्लाम स्वीकारण्याच्या दबावामुळे हिंदू मुलीने जीवन संपवले
अरविंद केजरीवाल यांची पुन्हा भविष्यवाणी
६७ प्रवाशांसह कझाकस्तानमध्ये लँडिंग करताना विमान कोसळले
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना अर्धी जळालेली दोन पानांची नोट सापडली आहे. या नोटमधून काही हाती लागतं का याचा तपास पोलीस करत आहेत.