दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात एक अपघाती मृत्यू झाला होता, जो आता खून असल्याचे सिद्ध झाले आहे. या मृत व्यक्तीचे नाव अशोक भालेराव असे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भावाने पोलिसांना या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार तपास केला असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
मृत अशोक भालेराव आणि त्याचे पाच साथीदारांनी काही वर्षांपूर्वी एक कट रचला होता. भालेरावने चार करोडची इन्शुरन्स पोलिसी घेतली होती. एका अपघातात अज्ञात व्यक्तीला मारून त्याला भालेरावचं नाव देऊन ते चार करोड स्वतःकडे ठेवणार होते. परंतु या योजनेला कोणीही बळी पडले नाही म्हणून भालेरावच्या साथीदारांनी पूर्ण डावच पलटवला. अज्ञात व्यक्तीला मारण्याऐवजी त्यांनी भालेरावला मारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भालेरावला कसे मारले हे अद्याप कळलेले नाही. काही वर्षांपूर्वी त्याचा मृतदेह इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक वर सापडला होता. त्यावेळी पोलिसांनी ‘हिट अँड रन’ प्रकरणात एका दुचाकी चालकाला अटक केली होती.
हे ही वाचा:
माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी
अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’
धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती
नुकताच भालेरावचा भाऊ दीपक यांनी पोलिसांना या प्रकरणाची परत चौकशी करण्याची विनंती केली. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला नव्हता तर त्याचा खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी मंगेश सावकर (आरोपींपैकी एक) आणि एका महिलेचे बँक खाते तपासले. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी मृताचा भाऊ आणि पत्नी असल्याचा बनावट दावा करत पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांना दोघांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात ठेवी सापडल्या. अधिक तपासात आणखी चार जणांचा सहभाग उघड झाला. त्या नंतर पोलिसांनी या सहाजणांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.