पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारला निघालेल्या रेल्वेमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ही घटना शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर घडली आहे. साजन बलदेव मांझी (वय ३०, रा. कानती नवादा, गया, बिहार) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

साजन व त्याचा पुतण्या बौधा मांझी हे दोघे १५ दिवसांपूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते. साजन हा आजारी होता. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुणे- दानापूर (पाटणा) ही गाडी पुण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. यावेळी गाडीत चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.

यावेळी साजन हा गाडीमध्ये चढत असताना गर्दीत अडकल्याने आणि दम लागल्याने त्याला त्रास होऊन तो प्लॅटफॉर्मवर कोसळला. त्यावेळी त्याचा पुतण्या, लोहमार्ग पोलिसांनी आणि अन्य प्रवाशांनी बेशुद्धावस्थेतील साजन याला लाेहमार्ग रुग्णलायात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

दरम्यान, दिवाळी दिवसातली वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकांसह रेल्वे गाडीत देखील गस्त वाढवण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पुणे स्थानकावरून रोज सुमारे दीड ते पावणे दोन लाख प्रवास करत असतात. दिवाळीत ही संख्या तीन लाखांच्या पुढे जाते. त्यामुळे वाढच्या गर्दीमुळे चोरीच्या किंवा इतर घटना घडू नये यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

Exit mobile version