लंडन येथील भारताच्या उच्चायुक्तालयावर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यातील एका आरोपीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे.गेल्या वर्षी मार्च २०२३ला लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान बेकायदा कृत्य केल्याबद्दल इंदरपालसिंग गाबा याला अटक करण्यात आली आहे. इंदरपाल हा या आंदोलनाल बेकायदा कृत्य करण्यात आघाडीवर होता.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या १९ व २२ तारखेला खलिस्तानी समर्थकांच्या मोर्चाचा उद्देश भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करणे हा होता. पंजाब पोलिसांनी खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगवर केलेल्या कारवाईमुळे लंडनमधील उच्चायुक्तालयावर हा हल्ला करण्यात आला होता.
हे ही वाचा:
सलमान खान गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी दोघांना अटक
यूट्यूबर मनीष कश्यपचा भाजपमध्ये प्रवेश!
‘राम मंदिराचा उल्लेख म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही’
पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत
पंजाब पोलिसांनी अमृतपालला पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबविली होती. त्याला फरार म्हणूनही घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांसमोर अमृतपालने शरणागती पत्करली. नंतर त्याला अटक करण्यात आली.
लंडनमधील भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी उच्छाद मांडला होता. त्यांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यासोबत अमृतपालचे फोटो असलेले बॅनरही लावण्यात आले होते. त्यात अमृतपालला सोडून द्या, अशी मागणीही केली होती. त्याचवेळी एक खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासावर लावलेल्या झेंड्यापाशी गेला आणि त्याने भारतीय तिरंगा खाली खेचला. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर दाखल केला आहे.